Posts

केव्हा तरी पहाटे केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे ! उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली ! उरले उरात काही आवाज चांदण्यांचे ..... आकाश तारकांचे, उचलून रात्र गेली! स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली ! आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी ..... ( हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली ) अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा ..... गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली ? -कविवर्य सुरेश भट भावना उत्कट आणि परिपक्व झाल्या की काव्य/गीत जन्म घेत असावे. भावना शब्दात बसवणे अतिशय कठीण असते हे नक्की, मात्र भावनेसाठी शब्द नसतात हे मात्र पटत नाही काहीसे. कारण शब्द संयोग भावनेच्या उत्कटेवर आधारलेला असतो. याचे एक उत्तम उदाहरण आहे कविवर्य सुरेश भट यांचे ‘केव्हा तरी पाहते गीत’. कवीच्या मनातील भावना किती   उत्कट आहेत हे कवितेतला शब्दन शब्द सांगू पाहतोय. Coming soon...